मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सेट/नेट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

असा लुटला जातोय सेट/नेट पात्रताधारक

    आज मराठवाडा महाराष्ट्रात बिनशर्त विलीन होऊन कित्येक वर्षे लोटली . निजामाच्या जुलमी राजवटीपासून सुटका मिळविण्यासाठी येथील सर्व जाती-धर्मियांनी मोठ्या संख्येने घरादारावर तुळशीपत्र ठेऊन हा लढा यशस्वी केला . भारत सरकारच्या पोलीस ऍक्शनने मराठवाडा स्वातंत्र्य भारताचा हिस्सा बनला खरा, येथील प्रश्न सुटताना दिसत नाहीत. ऐतिहासिक, संप्रदायिक, साहित्य  तसेच श्रमसंपदेने संपन्न असलेला मराठवाडा आजही कृषी, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रात खूप पाठीमागे असल्याचे दिसते. दुष्काळछायेतील या विभागात प्रत्येक ३ दिवसाला १ शेतकरी  आत्महत्या करताना दिसून येत आहे. यंदाही सर्व खरीप हंगाम करपलेला दिसून येतो.  मात्र, महाराष्ट्र शासनाला याचे सोयरसुतक असल्याचे जाणवत नाही. यामुळे येथील शेतकरी पाण्यासाठी हवालदिल होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे.       मराठवाड्यात जायकवाडी, निम्न दुधना, माजलगाव, मांजरा, विष्णुपुरी आणि  येलदरी एवढीच महत्वाची धरणे आहेत. यातील गोदावरी खोऱ्यात १९६ टीएमसी पाणी उपलब्ध होते. त्यापैकी ११५ टीएमसी ऊर्ध्व भागासाठी, तर ८१ टीएमसी पाणी जायकवाडीस...