मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रा. दिलीप महालिंगे नावाचा पाऊस

 प्रा. दिलीप महालिंगे नावाचा पाऊस                     मराठवाड्यातील वर्तमान शिक्षण पद्धत पाहिली असता अशी अनेक कला  महाविद्यालये आहेत, जिथे तीन वर्षांची पदवी पूर्ण झाली तरी  शिक्षक आणि विद्यार्थी यांची ओळख होत नाही. लाखो रुपये डोनेशन देऊन विकत घेतलेली नोकरी करताना असे नेहमीच घडते. बदलत्या काळासोबत कला शाखेपासूनच्या आशा-अपेक्षा संपत असल्याने सर्वत्रच शिक्षणाची उपेक्षा होताना दिसत आहे. महाविद्यालयाने ठरवून दिलेल्या वेळेत दोन वेळा थम करणे आणि नोकरी मिळवण्यासाठी भरलेल्या रकमेची वसुली कोणत्या मार्गाने होईल, याचाच पाठपुरावा करताना अनेक प्राध्यापक मित्र दिसून येतात. याचाच परिणाम म्हणून जसे एखादे दैनिक उघडले की, ‘अपघात’, ‘पतीकडून पैशासाठी छळ’, ‘दुकानात जाते म्हणून गेली अन परत आलीच नाही’ अशा बातम्या वाचायायला मिळतात.  त्यासोबत ‘थेसिस सबमिशनसाठी ५० हजारांची मागणी’, ‘पीएच.डी. व्हायवासाठी मागितले दीड लाख’, ‘विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी’ यासारख्याही बातम्या नेहमीची येत असतात. अशा काळात एखादा प्राध्यापक सेवानिवृत्त होत असता...