ओढा याशब्दाला ‘पाण्याचा प्रवाह’ आणि ‘कल’ हे दोन अर्थ आहेत. याचप्रमाणे कळ (वेदना, भांडणाचे कारण), खोड (झाडाचा बुंधा, सवय) हे शब्दही अनेकार्थी आहेत. आज मी ज्या पगडी शब्दाचा अर्थ सांगणार आहे, तो नक्कीच तुम्ही नव्याने जाणून घेत असाल. पगडी डोक्यात घालायची असते आणि ती विविध प्रकारची असते हे आपणास माहिती आहे. उदा. नवरदेवाची पगडी, पेशवाई पगडी, महात्मा फुले वापरत ती फुले पगडी, त्याच प्रमाणे शेतकऱ्याची पगडी आपण पाहिलेली आहे.
पगडी हा स्रीलिंगी शब्द आहे. साधारणपणे
पुरुषांच्या डोक्यावर बांधलेले पागोटे म्हणजे पगडी, असे आपणास माहिती आहे.एकूणच
पुरुषांचे शिरोभूषण म्हणजे पगडी होय. यामुळेच ‘शिर सलामत तो पगडी पचास’ ही म्हण
प्रचारात आली. मात्र, याच पगडी शब्दाला मुंबई परिसरात वेगळ्या अर्थाने वापरतात.
तिथे पगडी म्हणजे ‘जागा भाड्याने देणे अथवा घेणे.’ उदा. मी जागा पगडीने घेऊन घर
बांधले. या पगडी प्रकारात एखाद्याची जागा भाड्याने घेतली जाते आणि त्या जागेचा
वापर आपण आपल्या घरासाठी करू शकतो आणि पाहिजे तोपर्यंत केवळ जागेची पगडी देऊ शकतो.
ज्या दिवशी आपल्याला पगडी सोडून द्यायची आहे, त्यावेळी मूळ मालकाला तुम्ही
बांधलेल्या घराची होणारी किंमत सांगून ती घेऊन तुम्ही घेऊ शकता. आहे की नाही ही
कधीही न ऐकलेली पगडी !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा