मराठी भाषा शिक्षणात अर्थार्जनाची मोठी संधी आजच्या घडीला शिक्षणाची डिग्री केवळ कागद ठरत असताना फक्त पारंपरिक शिकून उपयोग नाही. काळ बदलत आहे. एक काळ असाही होता की, केवळ डी.एड./बी.एड. केले तरी सहज शिक्षक होता येत असे आणि दहावी/बारावी पास झाले की, किमान मिलिटरीत / पोलिसात भरती होता येत असे. आज मात्र सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण आहे. अगदी नेट/सेट/पीएच.डी. केली तरी नोकरी मिळत नाही. काही उच्च विद्याविभूषित तरुण वेठबिगारीची कामे करताना दिसून येतात, तर काही सीएचबीवर नोकरी करून पाच-सात हजारांत घर-संसार चालवण्याच्या फुटकळ प्रयत्न करताना दिसतात. डी.एड./बी.एड., नेट/सेट/पीएच.डी. करूनही आज नोकरी मिळविण्यासाठी पस्तीस ते पन्नास लाख रुपये डोनेशन भरावे लागते, हे काळे सत्य नाकारून चालणार नाही. एकीकडे ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,’ असे छाती ठोकून सांगणारा आपला समाज शिक्षणामुळेच जीवनलढा हरतोय की काय, अशी शंका निर्माण होत आहे. साधी गोष्ट आहे साधा वडापाव विकणारा आपली मुले लाखभर डोनेश...
अर्थ, व्यापार, कला, साहित्य , समाज , संस्कृती आणि वर्तमानावरील चिंतन.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा