जेमतेम २५ वर्षांचे आयुष्य लाभलेले धरतीआबा बिरसा मुंडा हे नाव आदिवासी नव्हे तर समस्त भारतात एक लढवय्या क्रांतिकारक म्हणून आदराने घेतले जाते. १८९०च्या दशकात जेव्हा संपूर्ण देश इंग्रज अमलाखाली होता आणि मेकालेचे शिक्षण घेऊन पांढरपेशी वर्ग गोऱ्या साहेबांची चाकरी करत होता त्या काळात बिरसा मुंडा छोटा यांनी नागपूर परिसरात 'आबुआ: दिशोम रे अबुआ: राज' अशी गर्जना करत साम्राज्यवादी राजवटी विरोधात संघर्ष पुकारला. बिरसा मुंडा यांचं नाव घेतलं की उलगुलान हा शब्द आपोआप ओठी येतो. उलगुलान म्हणजे 'सर्व क्षेत्रात एकाच वेळी केलेला उठाव, क्रांती' धरती आबा बिरसा मुंडा यांनी उलगुलानद्वारे समाजिक, वैचारिक, धार्मिक अशा सर्व प्रकारच्या गुलामगिरीला झुगारून आदिवासी जनसमूहांनी लढण्यास सज्ज राहण्याचा संदेश दिला. बिरसा मुंडा यांनी जल-जंगल-जमीन अशा सर्व नैसर्गिक संसाधनावर आदिवासींच्या पारंपरिक, सामूहिक हक्काचे संरक्षण केले. निसर्गाला ओरबाडणारी नफा केंद्रित भांडवली व्यवस्था नाकारली. धरती आबा बिरसा मुंडा 'मरण पत्करेन पण शरण जाणार ...
अर्थ, व्यापार, कला, साहित्य , समाज , संस्कृती आणि वर्तमानावरील चिंतन.