भाषा ही संवादाची एक प्रभावी साधन आहे , जी मानवी समाजाची अभिव्यक्ती आणि विचारांची देवाणघेवाण करण्याचे माध्यम आहे . भाषा फक्त संवाद करण्यासाठीच नाही , तर ती व्यक्तीच्या वैचारिक क्षमतेला धार देण्यासाठी आणि समाजातील विविध स्तरांशी कनेक्ट होण्यासाठी आवश्यक असते . विशेषतः आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात भाषा केवळ सांस्कृतिक ओळख बनून राहिलेली नाही , तर ती एक व्यावसायिक संधीदेखील बनली आहे . आज भाषा आणि व्यावसायिक संधी यांचे परस्पर संबंध वाढत चालले आहेत आणि अनेक नवीन क्षेत्रे उभी राहिली आहेत , ज्यामुळे लोकांना विविध प्रकारच्या करिअर संधी उपलब्ध होत आहेत . आजच्या वाणिज्यिक , शैक्षणिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भाषा शिकण्याचे महत्त्व प्रचंड वाढले आहे . व्यवसाय , उद्योग आणि सेवाक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एकापेक्षा अधिक भाषांचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे . जर एखाद्या व्यक्तीला बहुभाषिक कौशल्य असेल , तर त्याला जागतिक स्तरावर व्यावसायिक संधी मिळवणे खूप सोपे जाते ....
प्रा. दिलीप महालिंगे नावाचा पाऊस मराठवाड्यातील वर्तमान शिक्षण पद्धत पाहिली असता अशी अनेक कला महाविद्यालये आहेत, जिथे तीन वर्षांची पदवी पूर्ण झाली तरी शिक्षक आणि विद्यार्थी यांची ओळख होत नाही. लाखो रुपये डोनेशन देऊन विकत घेतलेली नोकरी करताना असे नेहमीच घडते. बदलत्या काळासोबत कला शाखेपासूनच्या आशा-अपेक्षा संपत असल्याने सर्वत्रच शिक्षणाची उपेक्षा होताना दिसत आहे. महाविद्यालयाने ठरवून दिलेल्या वेळेत दोन वेळा थम करणे आणि नोकरी मिळवण्यासाठी भरलेल्या रकमेची वसुली कोणत्या मार्गाने होईल, याचाच पाठपुरावा करताना अनेक प्राध्यापक मित्र दिसून येतात. याचाच परिणाम म्हणून जसे एखादे दैनिक उघडले की, ‘अपघात’, ‘पतीकडून पैशासाठी छळ’, ‘दुकानात जाते म्हणून गेली अन परत आलीच नाही’ अशा बातम्या वाचायायला मिळतात. त्यासोबत ‘थेसिस सबमिशनसाठी ५० हजारांची मागणी’, ‘पीएच.डी. व्हायवासाठी मागितले दीड लाख’, ‘विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी’ यासारख्याही बातम्या नेहमीची येत असतात. अशा काळात एखादा प्राध्यापक सेवानिवृत्त होत असता...